दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दहिवडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता मौजे दहिवडी ता. माण येथील संपूर्ण दहिवडी शहर व त्यामधील वाड्या वस्त्या हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी माण-खटाव तथा इन्सिडंट कमांडर शैलेश सुर्यवंशी यांनी 22 फेब्रुवारीच्या रात्री पासुन पुढील आदेश हाईपर्यंत घोषित केले आहे.   

प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने उघडीस सक्त मनाई करण्यात आली आहे. येथील लोकांना जीवनावश्यक साहित्य घरपोहोच करण्यासाठी दुकानदारांना अटी व शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार किराणा दुकानदार यांनी किराणा दुकान उघडुन स्वयंसेवकाद्वारे मागणी नोंदवून घ्यावी. त्याप्रमाणे किराणा मालाची योग्य मोजमापासह पॅकिंग करुन सदरचा माल स्वयंसेवक, कामगार, स्वत: मार्फत घरपेाहोच करावा. ग्राहकाकडून पैसे ऑनलाईन पेमेंट, गुगल पे, भीम ॲप इ. ऑनलाईन साधनांद्वारे पेमेंट करुन घ्यावे. जेथे ऑनलाईन पेमेंट शक्य नाही तेथे किराणामाल घरपोच करतेवेळी ग्राहकाकडून पैसे घेण्यात यावेत. किराणा दुकानदार, मेडकल दुकानदार, भाजी दुकानदार, स्वयंसेवक यांनी कामगारांची योग्य ती वैद्यकीय तपसणी करुन घ्यावी तसेच त्यांनी योग्य ती  आरोग्य विषयक काळजी व खबरदारी घ्यावी. माल घरपोच वितरण करतेवेळी मास्क, गलोज, सोशल डिस्टन्सींच्या अटी व शर्तीच्या बाबतींचा वापर बंधनकारक राहील. या वितरणात वेळोवेळी ठराविक कालावधीनंतर सर्व संबंधितांनी वेळोवेळी सेव्हन स्अेपप्रमाणे हात साबनाने धुने किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. वरील माल घरपोहोच पुरविण्याचा कालावधी दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 असा असेल.  

दुकानादारांनी ग्रामस्थांच्या जिवनावश्यक साहित्याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूची विक्री करु नये. किराणा दुकानदार, भाजीपाल दुकानदार, दुध पुरवठ्याची विक्री योग्य दरामध्यश्े करावयाची आहे. जादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार सक्त कारवाई करण्यात येईल. उपविभागी पालीस अधिकारी वडु, सहा. पोलीस निरिीक्षक दहिवडी संबंधिता पोलीस यंत्रणेमार्फत अतयावश्यक सेवेसाठी वाहन परवाना(पास) देण्यात येईल. पंरतू या परवाना व ओळखपत्राचा गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ सकत्‍ कारवाई करुन परवाना रद्द करण्यात येईल. स्वयंसेवक व किराणा, भाजीपाला, दुधपुरवठा घरपेाहेच पुरविण्यासाठी आवश्यक व्यक्तींना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच ग्राहकांना घरपोहोच माल मिळतो किंवा नाही याबाबतची खात्री दहिवडी नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यामार्फत करावी. यामध्ये कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कल 51 व भातीय दंडविधान संहिता1860 मधील कलम 188 अनवये फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद केले आहे.

error: Content is protected !!