स्ट्रीट लाईटबाबत मंत्र्यांसोबत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईट आणि पाणी पुरवठ्याचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण करुन वीज कनेक्शन तोडले होते. याबाबत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

सरपंच परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष आनंदराव जाधव ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषदेने राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली होती. परंतु आजच्या या बैठकीत
महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात येणार आहे.

error: Content is protected !!