साताऱ्यात १ ऑक्टोबरला नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (दक्षिण पीठ नाणिजधाम) यांच्या पादुका साताऱ्यात येणार असून त्यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा रविवार दि. १ ऑक्टोंबर रोजी साताऱ्यात होत आहे.पोवई नाका येथून देवयानी मंगल कार्यालय अशी पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर महिलांना घरघंटी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निरीक्षक दिलीपकुमार सोमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमरे पुढे म्हणाले, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मोळाचा ओढा येथील देवयानी मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. त्यापूर्वी पोवई नाका, बसस्थानक, मोळाचा ओढा मार्गे देवयानी मंगल कार्यालय अशी पादुका मिरवणूक काढण्यात येणार आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (दक्षिण पीठ नाणिजधाम) या संस्थानच्यावतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना घरघंटी वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर पादुका पूजन सोहळा, अमृतमय प्रवचन होणार आहे. कार्यक्रमाचा शेवट पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

यावेळी गोरगरीब शेतकऱ्यांना मोफत शेती बी, बियाणे, खते, शेती अवजारे वाटप केले आहे. तसेच दुर्बल घटक अंतर्गत उपक्रम निराधार महिलांना शिलाई मशीन, शेळ्या, मेंढ्या, दुभत्या गाई, म्हशींचे वाटप केले आहे. तर वैद्यकिय उपक्रमांतर्गत ४३ मरणोत्तर देहदान शासकीय महाविद्यालयांना दिले असून वर्षातून १ लाख लिटर रक्त दिले जाते अशी माहिती सोमरे यांनी केले. तर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!