जावळीत जिल्हा बँक निवडणुक मतदान केंद्रावर राडा

सातारा, (भुमिशिल्प वृत्तसेवा)  : सातारा जिल्हा बँकेच्या ११ जागांसाठी आज मतदान होत आहे. मेढा येथिल मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. दोन्ही गटात यावेळी काही वेळासाठी राडा झाला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा संघर्ष आता टोकाला पोहोचला असून रविवारी सर्व तालुक्यात घमासान होणार आहे. विशेषत: सोसायटी मतदारसंघांत थरार निर्माण झाला असून मतदार पळवापळवी झाली आहे. बँकेच्या ११ जागांसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मतदानासाठी सर्व केंद्रावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

यावेळी ऋषिकांत शिंदे, तेजस शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे हे आक्रमक झाले. रांजणे यांच्या पत्नी सौ अर्चना रांजणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ऋषिकांत शिंदे यांनी वसंतराव मानकुमरे व कुडाळचे प्रतापगड कारखाना संचालक मालोजीराव शिंदे यांना हातवारे करून एकमेकांना धारेवर धरले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार शिंदे व रांजणे दोघांनीही मध्यस्थी करून कार्यकर्त्यांन शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले.

error: Content is protected !!