सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जे लोक राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतात, ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले; पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकद असूनही पराभूत होतो, यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकरांशी संवाद साधला.
शिंदे म्हणाले, बॅंकेच्या निवडणुकीत ज्या दिवशी माझा पराभव झाला, त्याच दिवशी माझ्या विरोधात कट करस्थान करणारे नाचले, हे सर्वांनी पाहिले. मला गुंडगिरी करायची असती, तर मी गोव्यापासून सावंतवाडी ते अगदी जिथं-जिथं उमेदवार होते तेथून मी उचलले असते. परंतु, ते माझ्या रक्तातच नाही. शेवटपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश का केलं नाही, कारण त्यांनी मनापासून केलंच नाही. माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार आहेत, हे त्यांचंच षडयंत्र आहे,
मी सरळ पणाने निवडणूक केली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळं या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा, यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.