सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज सातारा तालुक्यातील परळीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या फार्म हाऊसवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर व जिल्हा बँकेच्या काही संचालकांची खलबते झाली. एका गुरूजींच्या सत्कार समारंभानिमित्त एकत्र आलेल्या या मंडळींनी फार्म हाऊसवर जाऊन एकत्र जेवण करत जिल्हा बँकेची रणनिती ठरवली असल्याची चर्चा आहे
You must be logged in to post a comment.