सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): नामदेव पतसंस्थेचे चेअरमन शिवनाथ मुळे यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.
शिवनाथ जगन्नाथ मुळे यांनी पुसेसावळी येथील राजाचे कुर्ले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 30 वर्षे ज्ञानदानाचे काम केले. नामदेव सहकारी पतसंस्थेचे ते सलग 35 वर्षे बिनविरोध चेअरमन या पदावर राहिले. नामदेव समाज परिषदेच्या ओबीसी संघटनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर सदस्य, पश्चिम महाराष्ट्र खजिनदार तसेच सातारा जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. नामदेव शिंपी समाजाच्या पुसेसावळीचे ते अध्यक्ष होते. पंढरपूरच्या कृष्णराज देवस्थान ट्रस्टचे ते सदस्यही होते. दैनिक साहस वार्ता वर्तमान पत्राचे संपादक श्रीकांत मुळे यांचे ते वडील होत.
नामदेव शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी खूप काम केले. मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते सर्वपरिचित होते. सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्थायीभाव होता.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुसेसावळी पंचक्रोशीत शोकाकूल वातावरण पसरले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेवून त्यांना आदरांजली वाहिली. सावडणे विधी उद्या शुक्रवार दि. 23 रोजी पुसेसावळी येथे होणार आहे.
You must be logged in to post a comment.