सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला आहे. यामुळे साताऱ्यात शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून होत आहे. यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर साताऱ्यात शिवप्रेमी आक्रमक झाले असून पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
You must be logged in to post a comment.