छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केल्याबद्दल गिरीश कुबेरांवर कारवाई करा – श्रीमंत कोकाटे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून गिरीश कुबेर यांनी छत्रपतींची बदनामी केली आहे. त्यांनी पुस्तकात केलेले विधान चुकीचे असून त्याला कोणत्याही स्वरुपाचे पुरावे नाहीत. या पुस्तकावर शासनाने बंदी आणावी, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रींमत कोकाटे यांनी केली.

श्रीमंत कोकाटे म्हणाले, स्वधर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहीती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर संतापजनक आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली, असे बिनबुडाचे दावे कुबेरांनी केलेले आहेत.

error: Content is protected !!