कृषीकन्यांतर्फे कार्यानुभवांतर्गत निगवे खालसा येथे प्रात्यक्षिक

महिला उद्योजक प्रोत्साहनासाठी पनीर निर्मिती मार्गदर्शन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी निगवे खालसा येथे महिला उद्योजक प्रोत्साहनासाठी पनीर निर्मितीचे प्रात्यक्षिक घेतले. त्यानुसार पनीर तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री व ती कशी बनवायची त्याची कृती महिलांना सांगितली.

छोटे लघु उद्योग आणि महिला उद्योजकता ही येणाऱ्या काळाची गरज असल्याचे कृषिकन्यांनी महिलांना सांगितले. तसेच यशस्वी उद्योजक कसे बनता येईल, याचीही माहिती कृषी कन्यांनी महिलांना दिली. योग्य त्या पद्धतीचे मार्गदर्शन कृषी कल्याण कडून मिळाल्याने स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले.

कार्यानुभवांतर्गत हे प्रात्यक्षिक कृषीकन्या श्रद्धा पाटील, आर्या राऊत, पूजा भोसले, साक्षी इंगुळकर, स्रवंथी मन्नम, श्रेया पाटील यांनी सादर केले.

या उपक्रमासाठी प्राचार्य डी.एन. शेलार, समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी एम.एन. केंगरे , प्रा.पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!