सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
बसपाचे जिल्हा संघटक अमर गायकवाड, जिल्हाध्यक्ष आनंद घोरपडे, नारायण काळेल, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष संतोष थोरात, सातारा विधानसभा अध्यक्ष सतीश गाडे, प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्यात, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी कराव्यात, खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात यावे, वाढत्या महागाईला कमी करण्यात यावे, कोरोनामुळे हात घरी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची वीजबिल माफ करण्यात यावे. कोविडमुळे मृत पावलेल्या मृतांच्या परिवारांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
You must be logged in to post a comment.