सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): राजापूर जि.रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्येप्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१० रोजी 12 वाजता निदर्शने केली जाणार आहेत. दरम्यान, तालुका पातळीवर पत्रकार संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ही निदर्शने केली जाणार आहेत.
राज्य पातळीवर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने झालेल्या बैठकीत आंदोलनाची भूमिका ठरवण्यात आली. या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव दीपक प्रभावळकर, प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सुजित आंबेकर ,डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारया पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार संरक्षण कायदा आहे.मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच दोन दिवसांपूर्वी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी निदर्शने केली जाणार आहेत.
You must be logged in to post a comment.