सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): गावकर्यांमध्ये ऐक्य ,जिद्द, कष्ट असल्यास गावांचा विकास सहज शक्य आहे. सर्वच गावांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे. चोरांबे गाव पूर्ण शक्तिनिशी विकास करीत असून गावकऱ्यांनी अशीच एकजूट ठेवावी आणि विकास साधावा, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
जावली तालुक्यातील मौजे चोरांबे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गाैडा यांनी भेट देऊन गावाच्या विविध विकासकामांची माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले,” चोरांबे गावाने पाणी, स्वच्छता, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. डोंगर उतारावर गाव असल्याने उन्हाळ्यामध्ये या गावांमध्ये पाण्याची टंचाई असल्याने जलस्वराज अंतर्गत ६ लक्ष लिटर ची मेटॅलिक पाण्याच्या टाकीचे काम करणेत आले आहे. टंचाई कालावधीत या टाकीमध्ये साठवण केलेले पाणी वापरता येते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या कालावधीतही पिण्याच्या पाण्याची गावाला कमतरता भासली नाही. डोंगर उतारावरील गावांमध्ये ज्या ठिकाणी भूगर्भात पाणी साठवू शकत नाही अशा गावांसाठी पाणी साठवण टाक्या आदर्शवत आहेत.
” भेटीदरम्यान गटविकास अधिकारी रमेश काळे, कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, उपअभियंता श्री. साठे व शाखाअभियंता श्री कांबळे, श्री भोई, श्री पवेकर, श्री कर्णे, श्री म्हात्रे, उप अभियंता ( वाई) , श्री कुलकर्णी, ( इसॅाल कंपनीचे प्रतिनिधी पुणे) आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.