सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरआले आहेत. आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरी परिसरातील पूरग्रस्तांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गावातील नागरिकांसाठी गावातील शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं.
You must be logged in to post a comment.