सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत. रस्त्याच्याबाजूची झाडे उन्मळून पडल्याने तसेच रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानेअनेक मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोंढावले नजीक देवरुखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून चार ते पाच घर गाढली गेली आहे. दरम्यान, प्रशासनाने तब्बल आठ तास रेस्क्यु आॅपरेशन करून २५ लोकांचा जीव वाचवला आहे.
गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वरसह वाई तालुक्यात ही जोरदार पडत असून वाईच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने मौजे बलकवडी तालुका वाई व नांदगणे फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावचा संपर्क तुटलेला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध ,भाताची रोपे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवरुखवाडी येथे भुस्खलनामुळे ४ ते ५ घरे गाठली गेली होती. घटनेची माहिती मिळताच रात्री आठ वाजता आ. मकरंद पाटील, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाने रेस्क्यु आॅपरेशन करून २५ लोकांना वाचवले आहे. तर अद्याप दोन लोक बेपत्ता आहेत. त्यांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.
You must be logged in to post a comment.