मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडियातील पत्रकारांना मिळाली ओळख

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद सातारा जिल्हा यांच्यावतीने सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या डिजिटल मीडियाच्या पत्रकार सदस्यांना सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते संघटनेचे अधिकृत सभासद असलेचे ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या ओळखपत्रामुळे नक्कीच डिजिटल मीडियातील सदस्यांना खरी ओळख मिळाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर,सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी,मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष दीपक प्रभावळकर, प्रसिद्धीप्रमुख दीपक शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य सुजित आंबेकर, डिजिटल मीडिया परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप, सदस्य संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व डिजिटल मीडियाच्या संघटनेच्या अधिकृत सदस्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्याबद्दल गौरवोद्गार काढून जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या वेळेला सातारचे पत्रकार नेहमीच संवेदनशिलरित्या काम करून जिल्हा प्रशासनाला सातत्याने मदत करत असल्याचे सांगून सातारच्या पत्रकारांचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी कौतुक केले. तसेच ओळखपत्र वाटप उपक्रमाचेही कौतुक केलं.

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर , जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे , सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी,डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त करत सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी आपल्या कार्याचा योग्य ठसा उमटवून संघटनेबरोबरच आपल्या पत्रकारितेचे नावलौकिक वाढवावे असे मत या मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले.

या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य चंद्रसेन जाधव,डिजिटल मीडिया परिषदेचे सातारा शहराध्यक्ष प्रतीक भद्रे,उपाध्यक्ष साई सावंत, सचिव गुरुनाथ जाधव, खजिनदार अमोल निकम ,प्रसिद्धी प्रमुख निखिल मोरे ,प्रमोद इंगळे ,समाधान हेंद्रे, विनीत जवळकर,महेश क्षीरसागर ,रिजवान सय्यद, शशिकांत कोरे ,सचिन सापते ,अमित वाघमारे ,विजय ल्हासुरे ,महेश चव्हाण ,किरण मोहिते ,कुणाल खंदारे ,संजय कारंडे, प्रशांत बाजी ,नंदू निपाने आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!