दिलीप वळसे पाटलांच्या हाती गृहखात्याची धुरा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. तर गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे गृहमंत्रीपद वळसे-पाटलांच्या गळात पडल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे.

दिलीप वळसे पाटील यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय. तशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं मंत्रिमंडळातील पॉवर आता अजून वाढणार आहे.

error: Content is protected !!