श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साताऱ्यात पोलिसांसाठी फुड पॅकेटचे वाटप

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात साताऱ्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड बंधू भगिनी यांना फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. गेली सलग २३ वर्ष हा उपक्रम राबवित असल्याचे श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड बंधु भगिनी यांच्यावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी असते, गौरी गणपती विसर्जनानंतर आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच शेवटच्या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असतात.यावेळी शाहूनगरवासीय मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होत असतात.

या कालावधीत खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये यासाठी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने सलग दोन दिवस पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड बंधु भगिनी यांना फुड पॅकेटचे वाटप केले. फुड पॅकेट मध्ये दोन चपाती, भाजी, भात व चटणीचा समावेश असतो.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या उपस्थितीत सदर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी गेली सलग २३ वर्ष बालाजी ट्रस्ट राबवित असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वाचे आभार मानले.

यावेळी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदिश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, नितीन माने, राजेंद्र खंडेलवाल, दिपक मेथा, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, जगदिप शिंदे, श्रावण पाटील, विश्वनाथ फरांदे, संजय केंडे व मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!