दिवसभरात 14 पॉझिटिव्ह; 19 जण कोरोनामुक्त


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 14 पॉझिटिव्ह आढळून आले तर 19 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

एनसीसीएस (पुणे) येथे तपासणी करण्यात आलेल्या 14 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये फलटण तालुक्यातील 61 व 32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील अनुक्रमे 28, 20 व 44 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा : राजापुरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
दरम्यान, विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमधून उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेल्या 19 जणांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.
error: Content is protected !!