दिवसभरात 47 तर एकट्या कराड तालुक्यात 28 पॉझिटिव्ह; 12 जण कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून शनिवारी आणखी 47 जणांची त्यात नव्याने भर पडली. यापैकी तब्बल 28 जण एकट्या कराड तालुक्यातील असल्याने कराड पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 938 झाली आहे. दरम्यान, आज आणखी 12 जणांना दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याने आजअखेर 711 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील 
वाई : कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष, खटाव : मायणी येथील 29 वर्षीय पुरुष,खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, माण: म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुष,  सातारा : धावली (रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष, खंडाळा : शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष, पाटण : उरुल येथील 60 वर्षीय पुरुष, नवसरे येथील 42 वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड : तारुख येथील 21 व 22 वर्षीय युवक तसेच अनुक्रमे 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि 45 व 50 वर्षीय महिला, चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष, जखीणवाडी येथील 47 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवती, 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक, लटकेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवक, 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवती, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 8 वर्षीय बालक, अनुक्रमे 30 व 50 वर्षीय पुरुष आणि अनुक्रमे 45 व 30 वर्षीय महिला, कोरेगाव : नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष, जावली : रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष असे एकूण 47 कोरोनाबाधित आढळले आहेत.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील 
वाई : सह्याद्रीनगर येथील 9 वर्षीय बालिका, खटाव : शिरसवाडी येथील 4 वर्षीय बालिका व 32 वर्षीय महिला, माण : 17 व 21 वर्षीय युवक तसेच 39 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : हरचंदी येथील 63 वर्षीय पुरुष,  सातारा : गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला, कराड : तुळसण येथील 25 महिला व 28 वर्षीय पुरुष व 5 वर्षीय बालिका, पाटण : शिराळ येथील 70 वर्षीय पुरुष, असे कोनामुक्त झाले आहेत. 
218 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 50, कृष्णा मेडिकल कॉलेज (करा येथील 45, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 39, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 34, ग्रामीण रुग्णालय (वाई) येथील 21, कोरोना केअर सेंटर (शिरवळ) येथील 10, रायगाव येथील 13, मायणी येथील 6 अशा एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.
error: Content is protected !!