दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू ; 80 पॉझिटिव्ह


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये निकट सहवासित आणि प्रवास करुन आलेले, अशा एकूण 80 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामध्ये 50 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. दरम्यान गुरुवारी दोन कारोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1187 झाली आहे. तर 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 खंडाळा  तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील 20 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, शिरवळ मधील शिंदेवाडी येथील 36, 21 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील 70 वर्षीय पुरुष,  आगाशिवनगर मलकापूर येथील 24 व 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय युवक, 27 व 55 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील 16,20,40 वर्षीय महिला, खानापूर येथील 27 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, शिरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील 20 वर्षीय युवक, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील 48 वषीय् महिला, संगमनगर येथील 14 वर्षीय मुलगी,खावली येथील 46 वर्षीय पुरुष, करंजे येथील40 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय युवक, कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षीय बालिका, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 55 वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील 35 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील 22 वर्षीय पुरुष असे 38 बाधित असून उर्वरीत 42 बाधितांमध्ये 17 महिला आणि 25 पुरुषांचा समावेश आहे.
सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु
सातारा येथील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला व रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची  माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. 54 वर्षीय महिलेस मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच व 49 वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आलेले असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता. 
आणखी 14 जणांना दिला डिस्चार्ज
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 2, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथुन 1, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 8, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथुन 3 असे एकूण 14 जणांना आज दहा दिवसांनंतर  रुग्णालयतून डिस्चार्ज देण्यात आला.  यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील  24 वर्षीय पुरुष, म्हाते खु. येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय बालक. सातारा तालुक्यातील गोजेगांव येथील 74 वर्षीय पुरुष, आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष.  कोरेगांव तालुक्यातील नायगांव येथील 44 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील धामणी येथील 50 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील  24 वर्षीय महिला, गोवारे येथील 40 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालीका.कराड तालुक्यातील तुळसण येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष अशा एकूण 14 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 
एका संशयिताचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल झालेल्या लिंब ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड संशयित म्हणुन उपचार करतेवेळेस त्याचा नमुना तपासणी करीता घेण्यात आला आहे. 
439 जणांचे अहवाल तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 32, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 55, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 51, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 50, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 3, वाई येथील 58, शिरवळ येथील 57,रायगांव येथील 3, पानमळेवाडी येथील 31, मायणी येथील 19, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 44, खावली येथील 31 असे एकूण 439 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  घेण्यात आले असुन एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
error: Content is protected !!