सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आडवा. त्यांना घरातून बाहेर पडून देऊ नका, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर उदयनराजेंच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्याउदयनराजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे. बाकीच्या समाजाला आरक्षण दिले गेले, त्यावेळी इतका अभ्यासही केला गेला नव्हता.
उदयनराजे म्हणाले, आरक्षण का मिळाले नाही, याचा जाब विचारा. त्यातून तुमचे समाधान झाले नाही तर माझ्यासह सर्वांना घराबाहेर फिरून देऊ नका. समाजामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. माझ्यामुळे समाज आहे, अशा मस्तीत आमदार व खासदारांनी राहू नये. मराठा समाजाने ठरविले तर तुमची मस्ती एका दिवसांत उतरवतील,
You must be logged in to post a comment.