युवा ग्रामविकास सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मुंबई येथील संबुद्ध फाउंडेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण २०२४ पुरस्कार साताऱ्यातील युवा ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश वाघमारे यांना जाहीर झाला आहे.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जगताप, सरचिटणीस अश्वजित जगताप यांनी ही माहिती दिली. प्रा.गणेश वाघमारे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२४ जाहीर केल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. जगताप यांनी दिली. पुरस्कार वितरण कार्यक्रम चार ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.अशी माहिती संबुद्ध फाऊंडेशनचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी दिली.
युवा ग्रामविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचं कृतिशील कार्य आम्ही करत आहोत. कामामधील सातत्य , मेहनत व विवेकी विचार त्यामुळं समाजामध्ये विविधांगी बदल घडत आहेत. एकूणच सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी निवड केली हीच माझ्या कामाची पोचपावती असून या सन्मानामुळे निश्चितच आणखी ऊर्जा मिळणार आहे.
– प्रा. गणेश वाघमारे, अध्यक्ष, युवा ग्रामविकास सामाजिक संस्था, सातारा.
You must be logged in to post a comment.