सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची बदली रत्नागिरी येथे झाली आहे. त्यांच्या जागी बीड जिल्ह्याहून डॉ.राधाकृष्ण पवार यांची नियुक्ती झाली. लवकरच डॉ. पवार पदभार स्विकारणार आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची नियुक्ती झाली होती. आपल्या कार्यकाळात डॉ. आठल्ये यांनी अनेक बाबतीत उठावदार कामगिरी केली. विशेष म्हणजे कोरोना विषाणू काळात डॉ. आठल्ये आणि त्यांच्या टीमने मोठे योगदान दिले. सुरूवातीच्या काळात सुट्टी आणि रजा न घेता काम करण्यात आले. आता डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची रत्नागिरी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी डाॅ. राधाकृष्ण पवार यांची नियुक्ती झाली आहे. ते सध्या बीड जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर काम करीत आहेत. लवकरच ते सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्विकारणार आहेत.
You must be logged in to post a comment.