सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्रावण महिन्यात पवित्र कृष्णा नदीच्या स्नानाची पर्वणी काही वेगळीच असते.शेवटच्या श्रावणी सोमवारी वाई तालुक्यातील गावातील ग्रामदेवतांच्य़ा मानाच्या पालख्या व भक्त स्नानासाठी कृष्णा नदीवर येतात. त्यामुळे गणपती घाटावर भक्तांची प्रचंड गर्दी होते. महागणपती घाटाला यात्रेचे स्वरूप आले होते.
गेली अनेक वर्षापासून ही परंपरा चालू असूनशेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने वाई तालुक्यातील ग्रामस्थ आपल्य़ा कुलदैवतांचेपालखीत बसवून वाजत-गाजत कृष्णातीरी आणून विधिवत पूजा, आरती करून स्नान घालूनपुन्हा गुलालाची उधळण करीत आपल्य़ा गावी मार्गस्त होतात. श्रावण महिन्य़ाचे औचीत्तसाधून या देवतांच्य़ा पालख्या दर वर्षी दक्षिणकाशीची गंगा म्हणून प्रसिध्द असणाऱ्याकृष्णामाईच्य़ा स्नानाला येण्य़ाची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. पूर्वी वाजत-गाजत बैलगाडीतून वाईच्य़ा गणपतीघाटावर कृष्णा नदीच्या स्नानाला आणले जात असे. हा सोहळापाहण्यासाठी गणपती घाटावर वाईकरांची मोठी गर्दी झालेली असते.
घाटावर ढोल-लेजीमचे ताल धरल्य़ामुळे घाटावरीलवातावरण भक्तिमय झाले होते. पूर्वी बैल गाड्यांतून कुलदैवतांना आणले जात असेपरंतु काळानुरूप सध्य़ा ट्रॅक्टर या टेम्पोमधून वाई शहराच्या वेशीपर्यंत आणले जाते,त्यानंतर मिरवणुकीने सर्व पालख्या कृष्णा नदीवर स्नानासाठी येतात. महागणपती घाट व काशिविश्वराचे दर्शन घेवून भाविक आपल्य़ा ग्रामदेवतेला पालखीतठेवून मिरवणुकीने आपल्य़ा गावी निघून गेल्य़ा. फुलेनगर येथील भद्रेश्वर मंदिरात सुध्दा भक्तांची
प्रचंड गर्दी होती. लांबच-लांब भक्तांची रांगा लागलेल्य़ा होत्य़ा. व्यापाऱ्यांची दुकाने बेल-फुलांच्या हारांनी व प्रसादाच्या साहित्त्यांनी सजलेली होती, पालख्यांना पाहण्यासाठी वाईकरांनी चांगली गर्दी केली होती.
You must be logged in to post a comment.