संघटनेला सोबत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीला ठरणार फायदेशीर
वडूज,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : उत्तम फौज , कडवा जनसंपर्क, कसलेले कार्यकर्ते, उत्कृष्ट वकृत्वशैली व सभा जिंकण्याची कसब या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध राजकीय आयुधांमुळे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या जाहीर प्रचार यंत्रणेत मोठी रंगत आली आहे, तर विद्यमान आमदारांच्या पोलखोलने परिवर्तन अटळ असल्याचे दिसून येत आहे.
उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या जाहीर प्रचार यंत्रणेत मोठी रंगत आली आहे, तर विद्यमान आमदारांच्या पोलखोलने परिवर्तन अटळ असल्याचे दिसून येत आहे.माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तोफांकडून प्रचंड कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने विखळे येथील जाहीर सभेत आमदार गोरे यांनी “विरोधकांकडे पैसे आहेत, माझ्याकडे काय चिचुके आहेत का?… ” या सर्वश्रुत जाहीर सभेतील प्रश्नाला प्रतिउत्तर देताना आमदार गोरेच्यांकडे एवढे पैसे कुठून आले हा फार संशोधनाचा विषय ठरत आहे. यांच्या बापजाद्याची कोठेही प्राँप्रटी अथवा फॅक्टरी नाही. मग एवढे पैसे येतात कोठून तर कामातील टक्केवारी , प्रशासकीय बदल्या, अवैध वाळू उपसा, मद्य व्यवसाय व हप्ते यातून ही मोहमाया गोळा केली आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात वडूजसह खटाव तालुक्याच्या डोळ्यात पाणी आले तरी पिण्याच्या व शेती पाण्यापासून वंचित ठेवले. पिके वाळून गेली, माणसांसह जनावरालासुध्दा पाण्यापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. या व अशा अनेक गंभीर प्रश्नांवर जनतेची चेष्टा केल्याने या निवडणूकीत जनता व काळ माफ करणार नाहीत . अशा शेतकरी संघटनेच्या जाहीर सभेतील व्यक्तव्यामुळे आमदार गोरे यांची प्रचार यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे, असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रचार सभेत प्रश्न विचारत आहेत.
माण – खटाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कोपरा व जाहीर सभा खऱ्या अर्थाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार राज्य प्रवृक्ते अनिल पवार , तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे , सुर्यभान जाधव , तानाजी देशमुख आदीसह संघटनेच्या मावळ्यांनी प्रचार सभेत रंगत आणून विद्यमान आमदारांची कोंडी केली आहे .
याचबरोबर मतदार संघात सांगलीचे गुंड आणून दहशत माजवण्याचा प्रकार आणि वारेमाप अवैध पैशांची मस्ती असल्याने लोकशाही धोक्यात आणली आहे. तसेच येथील युवकांचे भविष्य अंधकारमय केले आहे. सुज्ञ मतदार नागरिकांना, माता – भगिनींना व युवकांना हा मस्तावलेला पैलवान चितपट करण्याची हीच एकमेव नामी संधी मिळाली आहे, अशी भूमिका घेत, परिवर्तनाचा ध्यास धरून संधीचे सोने करू हाच अजेंडा स्वाभिमानी शेतकरी संघटना घेऊन मतदारसंघात उतरली असल्याचे दिसून येत आहे, असे जाणकारांचे मत आहे.
You must be logged in to post a comment.