सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोयना धरण परिसर आज (शनिवार) दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला. शनिवारी दुपारी २.१४ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसला आहे.
जानेवारीला दुपारी २.१४ ला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाच्या धक्क्याची खोली ४ होती. या भूकंपाच्या धक्क्याच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच हेळवाक गावाच्या नैऋत्येस ६ किमी होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवला आहे. या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.