सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भुकंपाचे सलग दोन सौम्य धक्य जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी तसेच १ वाजून ५७ मिनिटाला दुसरा धक्का जाणवला. दोन मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर पहिल्या भुकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल नोंदविली गेली असून भूकंपाच्या केद्रबिदुची खोली सात किलोमीटर खोल इतकी होती. त्यानंतर दोन मिनिटांनी झालेल्या दुसऱ्या भुकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली. याची खोली सात किलोमीटर होती. दोन्ही भुकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील जावळे गावाच्या व्यायव्ये दिशेस आठ किलोमीटरवर होता. भुकंपाचे सलग दोन धक्के पाटण कोयना परिसरात जाणवला. जमीनी व घर थरथरल्याने लोक भीतीने घराबाहेर पडले. गेल्या महिन्यात २० तारखेलाही सलग भुकंपाचे दोन धक्के जाणवले होते. या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असून कोणतीही वित्तहानी झाली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.
You must be logged in to post a comment.