सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. कारखान्याला दिलेले ९६ कोटींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले? याचा खुलासा करण्याची या नोटिसीत म्हटले आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी लिलावात घेतला होता. हा कारखाना घेत असताना संबंधितांना चार विविध बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने संबंधितांना ९६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. ईडीने नुकताच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. या कारखान्याची संबंधित सर्व कंपन्यांची कसून चौकशी मार्फत सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज वाटप बाबत खुलासा मागविण्यात आला असल्याने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जरंडेश्वर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्ज वाटप केले आहे. हे कर्ज रीतसर येत्या दिलेले आहे. तसेच कर्जाची परतफेड देखील वेळेत सुरू आहे. डीडीने नोटीस नाही दिली तर कर्ज वाटपाबाबत माहिती मागवलेली आहे आम्ही देणार आहोत.
– डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक
You must be logged in to post a comment.