एका आठवड्यात 374 जणांना बाधा,13 जणांचा मृत्यू


दिवसभरात तिघांनी गमावला जीव ; आणखी 58 पॉझिटिव्ह

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा काही कमी होण्याचे नाव घेईना. सहाव्या लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 1 ते 7 जुलै अखेर तब्बल 374 जणांना कोरोनाची बाधा झाली तर 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आणखी 58 जण पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1419 वर पोचली असून आजअखेर 58 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, मंगळवारी 46 जण पूर्णपणे बरे होवून आपापल्या घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथे कान्नरवाडी (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष, जिहे (ता. सातारा) येथील 58 वर्षीय पुरुष आणि फडतरवाडी (ता. फलटण) येथील 42 वर्षीय पुरुष या तीन बाधित पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
सातारा : धनगरवाडी (कोडोली) येथील 48 वर्षीय पुरुष, करंडी येथील 59 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 42 वर्षीय आरोग्य कर्मचारी, जावळी : कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष, कोरेगाव : सुभाषनगर येथील 75 वर्षीय पुरुष, खंडाळा : लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण : 34 वर्षीय पुरुष, खटाव : फडतरवाडी येथील 23 वर्षीय पुरुष असे 11 कोरोनाबाधित आढळले असून मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार आणखी 47 जण बाधित आल्याने दिवसभरात 58 बाधितांची नोंद झाली आहे. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
कराड : खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील अनुक्रमे 40, 20 व 65 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय बालक व 34 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, अनुक्रमे 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला, पाटण : सितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला,  31 वर्षीय पुरुष, कर्टे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, जावली : रामवाडी येथील अनुक्रमे 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला तसेच अनुक्रमे 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष आणि 1 वर्षाचे बालक, पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा : शहाजी चौक शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष, माण : खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष, सातारा : जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, दहिवडी (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव : नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष, खटाव : बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला, अशा 46 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

340 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 27, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 67, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 40, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 31, वाई येथील 23, शिरवळ येथील 72, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 26, मायणी येथील 16, खावली येथील 27 अशा एकूण 340 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आरोपी पॉझिटिव्ह येताच अधिकारी-कर्मचारी क्वारंटाईन !
जिल्हा कारागृहात पाठवलेला एक आरोपी पॉझिटिव्ह आढळल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यातील एका अधिकार्‍यासह 12 कर्मचार्‍यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तालुका पोलिसांनी या आरोपीला पोक्सो गुन्ह्याखाली 4 जुलै रोजी अटक केल्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कारागृहात नेल्यावर त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती.


सातारा तालुक्यातील बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपरिषद हद्दीतील बुधवार पेठ, तालुका हद्दीतील करंडी, धनगरवाडी (कोडोली), कारंडवाडी, पाटखळ (माथा) या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरिता असणारी वेळ जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. तसेच जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.
error: Content is protected !!