…एका थप्पडीने घेतला जीव !

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मुलीची छेडछाड केली म्हणून मानलेल्या मामानं त्याच्या कानाखाली एक थप्पड मारली. या थप्पडची किंमत आपल्या जिवाशीनिशी जाईल, अस मामाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यान मनात डूक ठेवून संधी मिळताच मामाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. मामा निपचित पडल्यानंतरच तो शांत झाला आणि शरणागती पत्करून पोलीस ठाण्याच्या दिशेने चालू लागला. ही एखाद्या चित्रपटातील घटनेला शाभेल, अशी घटना साताºयातील पॉवरहाऊसजवळ शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

बबन हणमंत गोखले  (वय ४२, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्या खुनाने समर्थ मंदिर परिसर अक्षरश: स्तब्ध झालाय. गोखले झोपडपट्टी दलचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा समाजामध्ये नेहमी वावर असायचा. पेठेतील नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. त्यांना सर्वजण मामा या नावाने ओळखायचे. म्हणे मुंबई येथे शुभम कदमने (वय २०) काहीतरी उचापती केल्या म्हणून त्याच्या आईने काही महिन्यांपूर्वी मुंबईहून साताºयात आणून सोडले.  त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर त्याची आई मुंबई येथे राहाते. तो एकटाच पॉवरहाऊस येथील झोपडीत वास्तव्य करत आहे. तो एकटाच असल्याने गोखले यांना त्याची दया येत होती. त्यामुळे ते रोज घरातून त्याच्यासाठी जेवणाचा डबा आणत होते. मात्र, हे घरातल्यांना माहिती नव्हते. स्वत:साठी जेवणाचा डबा म्हणून ते आणायचे आणि शुभमला द्यायचे. असा रोजचा त्यांचा दिनक्रम सुरू होता. दोन महिन्यांपूर्वी शुभमने एका मुलीची छेड काढली होती. त्यावेळी गोखले यांनी त्याच्या कानाखाली एक थप्पड मारून त्याला सुधार, अशी तंबी दिली होती. निराधार असलेल्या शुभमला गोखले यांनी आधार दिला होता. पण शुभमच्या मनात मामाविषयी राग खदखदत होता. एका थप्पडची किंमत मामाला चुकवावीच लागेल, अस मनात ठरवूनच तो संधीची वाट पाहात होता. आणि संधी मिळताच अंड उधारीच निमित्त ठरवून गोखलेंचा त्यांना जीव घेतला.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजता गोखले यांनी दुकान उघडलं. उदबत्ती लावली. त्यानंतर काही वेळातच शुभम तेथे आला. मला अंड उधार दे, असे मामाला म्हणाला. त्यावेळी गोखले यांनी पाच मिनिट लवकर आला असतास तर तुला उधार अंड दिलं असतं. आता सायंकाळची वेळ आहे. दुकानातल उधार काही देता येत नाही, अस शुभमला त्यांनी सांगितलं. मात्र, शुभम अडून बसला. यावरून दोघांची थोडी शब्दीक चकमकही झाली. पण पुढे हा वाद एवढा विकोपाला जाईल, असे कोणालाही वाटले नाही.


error: Content is protected !!