एकाचा मृत्यू, 846 पॉझिटिव्ह; 678 कोरोनामुक्त

दिवसभरात दोघांना बाधा, दहा जणांची घरवापसी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात मंगळवारी आणखी दोन पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मधून 10 जणांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता इतकी झाली असून आजपर्यंत जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 40 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

दोन जण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
पाटण तालुक्यातील सडा दाडोली येथील 70 वर्षीय पुरुष व कराड तालुक्यातील चरेगाव येथील 55 वर्षीय या दोघांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथे दाखल असणार्‍या फलटण येथील सारी व कोरोनाबाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान आज मंगळवारी मृत्यू झाला.
‘त्या’ मृत व्यक्तीस ‘बाधित मृत्यू’तून वगळले
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दि.19 जून रोजी मृत्यू पावलेला 69 वर्षीय पुरुष मृत्यू पश्चात बाधित निघाला होता. मात्र शासन नियमाप्रमाणे मृत्यू पश्चात चाचणी करायची नसल्याने तो बाधित मृत्यूमधून वगळण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृत्यूंची एकूण संख्या 40 झाली आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे : जावली : धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष, खटाव : राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष, बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष, निढळ येथील 24 वर्षीय महिला, माण : गोंदवले बु. येथील 63 वर्षीय महिला, कोरेगाव : 53 वर्षीय महिला व चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष,  सातारा : निशिगंधा कॉलनी (बारावकरनगर) येथील 14 व 17 वर्षीय युवती, असे 10 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 
101 जणांचे नमुने निगेटिव्ह
एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांच्याकडून 101 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविण्यात आले आहे. 
218 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 11, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 85, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 38, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 1, ग्रामीण रुग्णालय (वाई) येथील 17, शिरवळ येथील 9, रायगाव 15, पानमळेवाडी 19, मायणी 11, महाबळेश्वर 4, पाटण येथील 8 अशा एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. 
error: Content is protected !!