शिवसेनेच्या (शिंदे गट) सातारा जिल्हा प्रमुखपदी पुरूषोत्तम जाधव आणि जयवंत शेलार यांची निवड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारच्या जिल्हा प्रमुखपदी जबाबदारी पुरूषोत्तम जाधव व जयवंत शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांची ही जिल्हा प्रमुख होण्याची इच्छा होती. पण, त्यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच शरद कणसे यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख जबाबदारी दिली आहे. उद्या शिवसेनेच्या होणाऱ्या मेळाव्यात उर्वरित पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करणार आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरवात करून शिवसेनेचे संघटन वाढविण्यास प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात शिंदे गट शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून जिल्ह्यावर आगामी निवडणूकीत भगवा फडकविणार आहे, असे स्पष्ट मत शिंदे गटाचे नुतन जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी आज साताऱ्यात व्यक्त केले.

error: Content is protected !!