तुमचा राजेशाही थाट उतरवण्यासाठीच निवडणूक; आ.शिवेंद्रराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आम्ही व रामराजे राजे असूनही मवाळ आहोत म्हणून लोक आमच्यासोबत आहेत. तुम्ही राजे नसतानाही तुमचा राजेशाही थाट असतो. तुमचा हा राजेशाही थाट उतरवण्यासाठीच सर्वसामान्य जावलीकरांनी निवडणूक हातात घेतली, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर पलटवार केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली होती. त्याला शिवेंद्रराजे यांनी जावळी तालुक्यातील एका कार्यक्रमात उत्तर दिले.
शिवेद्रसिंहराजे म्हणाले, तुम्ही म्हणता राजे बिनविरोध झाले. मकरंदआबा कुठले राजे आहेत ? राजू राजपुरेचे कोणते राजघराणे ? दत्तानाना काय खंडाळ्याचे राजे आहेत काय ? हे सगळे माझ्याआधी बिनविरोध झाले.

तुम्ही म्हणता राजे बिनविरोध झाले. मकरंदआबा कुठले राजे आहेत ? राजू राजपुरेचे कोणते राजघराणे ? दत्तानाना काय खंडाळ्याचे राजे आहेत काय ? हे सगळे माझ्याआधी बिनविरोध झाले. शशिकांत शिंदेसाहेब हिशेब चुकते करण्याची भाषा करू नका. यापुढेही आमची दोन हात करण्याची तयारी आहे. तुम्ही आतापर्यंत दहशत माजवली मात्र यापुढे तुम्हाला सातारी हिसका सहन होणार नाही, असे आव्हानच त्यांनी दिले.

error: Content is protected !!