बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाचा एल्गार

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथे कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्यात यावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाने बुधवारी बॉम्बे रेस्टॉरंटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला.

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्तीदलाने भव्य आंदोलन केले. या मोर्चामध्ये तीन हजारांच्या वर नागरिक सहभागी झाले होती.

error: Content is protected !!