किसन वीर कारखान्यावर साडे आठशे कोटी कर्ज असेल तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन : मदन भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसन वीर कारखान्यावर हजार कोटींचे कर्ज आहे, असे म्हणणे धादांत खोटे आहे. साडे आठशे आणि हजार कोटींचा मध्य काढा त्यापेक्षा एक रूपयाही जास्त निघाला तर हा मदन भोसले कारखान्याच्या कामाकाजातूनच नव्हे तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, असा विश्वास माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला आहे.

किसन वीर कारखाना यावेळेचे गाळप करणार असून आमची गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. गाळप परवाना मागण्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांची थकित देणी देणार आहे, असे सांगून मदन भोसले म्हणाले, सार्वजनिक जीवनात आपण भले, आपले काम भले या भुमिकेत मी असतो. समाजात कोणी काही बोलत असतील टीका करत असतील. तर त्याला रोज उत्तरे देणे योग्य नाही. पण त्यांच्या टीकेचा अतिरके व्हायला लागला.

तसेच माझ्या नावापोटी संस्थेच्या प्रतिमेविषयी लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामुळे मी आज बोलत आहे. कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज आहे, ही वस्तुस्थिती आहे का, या प्रश्नावर श्री. भोसले म्हणाले, संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. किसन वीर वर एक हजार कोटींचे कर्ज आहे, असे म्हणणे धादांत खोटे आहे. साडे आठशे आणि हजार कोटींचा मध्य काढा, त्याच्यापेक्षा एक रूपया जास्त निघाला तर मदन भोसले कारखान्याच्या कामाकाजातून नव्हे तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल, एक दिवसही कार्यरत राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!