सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा ) : राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने दोन ठिकाणी रेड टाकून दोघांकडून विदेशी दारुसह २ लाख ५० हजार ५१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त
केला. या दोन्ही कारवाई पांडे ता.वाई व नायगाव ता.कोरेगाव येथे करण्यात आल्या आहेत. तुषार सुरेश पवार (रा.पांडे ता.वाई), अतुल पोपट धुमाळ (रा. नायगाव ता.कोरेगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत एक्साईज विभागाने दिलेली माहिती अशी, पांडे गावच्या हद्दीत एकाकडे दारुचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता संशयित तुषार पवार याच्याकडे विदेशी ४७ बाटल्या तर देशी ४८ बाटल्या सापडल्या. पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असता विदेशी दारु केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असणार्या होत्या.
एक्साईज पथकाने अतुल धुमाळ याच्या अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे १२ दारुच्या बाटल्या सापडल्या. ‘पथकाने अधिक तपास केला असता या बाटल्या देखील केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी होत्या. पथकाने पंचनामा करुन दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, दोन्ही ठिकाणी एक्साईजची रेड पडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. एक्साईजची ही कारवाई अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, रोहित माने, संतोष निकम, सचिन खाडे, महेश मोहिते, नितीन जाधव, अजित रसाळ, उदय जाधव,किरण जंगम यांनी केली. याचा पुढील तपास नंद क्षीरसागर करत आहेत.
You must be logged in to post a comment.