प्रेमाची लालच दाखवून मारहाण करत असल्याची फेसबुकवर बदनामी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): शहरातील उपनगरात राहणाऱ्या एका दाम्पत्याची अज्ञाताने फेसबुकवर बदनामी केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका दाम्पत्याचा फोटो फेसबुकवर व्हायरल होत असल्याची माहिती त्यांच्या मित्राने त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर पाहिले असता, ‘मनोज अक्षय’ या नावाने बनावट खाते उघडले असल्याचे समोर आले. संबंधिताने ‘ही महिला प्रेमाची लालच दाखवते. घरी नेते आणि मारायला सांगते, हा फोटो सगळीकडे शेअर करा, असे लिहिले आहे. तसेच कव्हर फोटोजखाली संबंधित नवरा-बायको असून, हे प्रेमाची लालच दाखवतात तसेच घरी नेतात. मारहाण करून खिशातील पैसे काढून घेतात. ते धंदा करतात. हा व्हिडीओ सगळीकडे शेअर करा. या दोन माणसांपासून सावध राहा’, असे लिहून हा मजकूर व्हायरल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर शाहूपुरी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

error: Content is protected !!