सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी दिली.
सातारा शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्यात नगरसेवक रविंद्र ढोणे यांच्यासह तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रासिटीतंर्गत) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत रविंद्र ढोणे म्हणाले, संभाजी वायदंडे यांच्या खाजगी जागेच्या परिसरात गटार खोदण्यात येत आहे.मात्र दुबळे यांनी या कामास विरोध करून अडथळा आणला आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी पालिकेच्या माध्यमातून प्रभागात विकास कामे सुरू आहेत.पण राजकीय हेतूने ही तक्रार करण्यात आली आहे. प्रशासन आणि न्यायपालिकेवर आमचा विश्वास असून पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची खातरजमा करून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कोणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले तर लोकसेवक म्हणून आम्ही विकासकामे कशी करायची असा सवाल नगरसेवक ढोणे यांच्यावतीने करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.