फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा हटवू नये; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात पत्री सरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा फलटण येथील पुतळा हटविण्याचा डाव हाणून पाडण्यात येणार आहे. ह्याबाबत नुकतेच सामाजीक कार्यकर्ते सम्राट गायकवाड यांनी निवेदनाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा क्रांतिकारी इतिहास व त्यांचा पुतळा हटविण्याचा आखण्यात आलेला डाव, ह्याबाबत विस्तृत माहिती सादर केली. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी  क्रांतिसिंह पाटील यांच्या क्रांतिकारी इतिहासाची जाण असल्याचे सांगत पुतळा स्थलांतरित न करता काय उपाययोजना करण्यात येतील, ह्याबाबत फलटण पालिका प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासित केले.

वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिध्द करण्यात आले. ह्या बाबत फलटण पालिकेने अधिकृत निर्णय घेतला नसला तरी येत्या काळात  क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला जावू शकतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा सहभाग राहिला आहे. इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी पत्री सरकार स्थापन केले होते. त्याबाबतचा इतिहास सर्वश्रुत आहे. अशात ज्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा ज्या चौकात आहे. त्या चौकातील वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून ह्या पूर्वी गोरगरिबांची अतिक्रमणे पालिकेने कोणतीही नोटीस न बजावता कोरोना काळात मार्च 2020 मध्ये पाडली होती. त्या लोकांचे अद्याप पुनर्वसन ही केले गेले नाही. ही बाब पाहता अतिक्रमणे काढल्याने त्या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पालिकेने निकालात निघाला होता.
तसेच त्या चौकातील वाहतूक वळविण्यासाठी रिंगरोड देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. असे असताना आता रस्ता रुंदीकरण, सुशोभीकरण आदी. कामे करण्याच्या नावाखाली तथा कंत्राटदार आणि लागेबांधे असलेल्या राजकीय नेत्यांचे आर्थिक भले करण्यासाठी थेट क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या तयारीत पालिका असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब वैचारिक दृष्ट्या निश्चित गंभीर व वेदनादायी आहे. आज ही इतिहासाच्या नोंदीत आणि नेत्यांच्या भाषणात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सातारा असे संबोधले जाते. तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा फक्त फलटण येथे आहे.
अशा परिस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील यांचे वैचारिक स्वरूपात असलेले प्रतीक म्हणजे पुतळा स्थलांतरित करणे हे कृत्य म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील इतिहास पुसण्याचा डाव आखला जात आहे काय ? असा देखील गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा स्थलांतरित करण्यास आमचा प्रखर विरोध असून  जिल्हाधिकारी तथा प्रमुख प्रशासकीय अधिकारी ह्या नात्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा स्थलांतरित करण्यास प्रतिबंध करण्याबाबत फलटण पालिका मुख्याधिकारी व संबंधित खातेप्रमुख यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे गुरुवारी करण्यात आली.
त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांनी  क्रांतिसिंह पाटील यांच्या क्रांतिकारी इतिहासाची जाण असल्याचे सांगत पुतळा स्थलांतरित न करता काय उपाययोजना करण्यात येतील, ह्याबाबत फलटण पालिका प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासित केले
error: Content is protected !!