सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रमिक मुक्तीदलाच्यावतीने दि. ९ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गावी कटगुण, ता. खटाव येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती डाॅ भारत पाटणकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
डाॅ. पाटणकर यांनी म्हटल आहे की, केंद्र सरकारने कोणत्याही चर्चेविना संसदेत तीन कृषी कायदे मंजूरी केली. हे कायदे बनवत असताना त्यांनी विरोधी पक्षांना विचारात न घेता एकाधिकारीशाहीतून हे कायदे तयार केले आहे. गेल्या महिन्या भऱापासून देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु सरकारला अद्यापही तोडगा काढता आला नाही.
या कृषी कायद्याच्या माध्यमातून उद्योगपतीचे भले होणार असून शेतकरी देशोधडीला लागेल. यासाठी हे कायदे रद्द करावे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याच्या समर्थनात आणि श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने कटगुण येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
You must be logged in to post a comment.