एफआरपीसाठी शेतकऱ्यांची बाईक रॅली

फलटण, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :एकरकमी एफ आर पी मिळावी, ऊस वाहतूकदारांना डिझेल दर वाढल्यामुळे वाहतूक दर वाढवून मिळावेत व वीज पंप धारकांची बिले ऊस बिलातून कापू नयेत, या मागण्या करता फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज मोटार सायकल रॅलीद्वारे तालुक्यातील चारही साखर कारखाने आणि प्रांत व तहसीलदार यांना निवेदन दिले.

आज सकाळी गोखळी पाटी (ता फलटण) येथे सर्व उसउत्पादक शेतकरी एकत्र आले. मोटार सायकलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीराम कारखान्याच्या मुख्य कार्यालयात तसेच शरयू इंडस्ट्रीज कापशी,लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखाना उपळवे,श्री दत्त इंडिया कारखाना साखरवाडी या फलटण शहरातील  सम्पर्क कार्यालयात जाऊन निवेदन दिले. त्यानंतर प्रांताधिकारी डॉ शिवाजीराव जगताप,तहसीलदार समीर यादव यांनाही निवेदन दिले निवेदनात शासन स्तरावर आमच्या प्रमुख मागण्या एफ आर पी एकरकमी देणे, वाहतूकदारांना दरवाढ देणे व वीज पंप धारकांची बिले परस्पर ऊस बिलातून कपात न करणे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यात आली

या रॅलीत  बजरंग खटके  तानाजी गावडे  बजरंग गावडे , विश्वास गावडे , बाळासाहेब गावडे, संजय गोरे ,शिवाजी शेडगे, प्रमोद गाडे ,योगेश गावडे ,रोहन गावडे ,अमित खटके सत्यजित खटके, रतन  गावडे, दिलीप रणवरे, रुपेश पाटील, रमेश गावडे, गणेश कापले, सचिन खटके आदी ऊस उत्पादक शेतकरी  सहभागी झाले होते.

error: Content is protected !!