सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत तसेच वीज दरवाढीविरोधात भाजप नेते अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुक मोर्चा काढून आज कराड तहसीलदारांना व महावितरणच्या अधिका-यांना निवेदन दिले.
गेल्या दीड वर्षापासून नागरिकांवर कोरोनाचे मोठे संकट घोंगावत आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यातच गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या पण त्याची अमंलबजावणी मात्र शुन्य आहे.अशा स्थितीत राज्य शासनाला जाग आणण्यासाठी भारतीयजनता पार्टी च्या वतीने तहसिलदार कार्यालय, कराड येथे मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.