कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीस पोलिसांना घेतले ताब्यात


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. कराड येथे कृषी कायद्याविरोधात त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. येथील कोल्हापूर नाक्यावर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात त्या सहभागी झाल्याने त्यांच्यासह अन्य आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज शनिवारी 6 रोजी कृषी कायद्यांना विरोध व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण याही सहभागी झाल्या होत्या. तसेच शेतकरी संघटनांसह भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले होते. 


कोल्हापूर नाक्यावर कृषी कायद्यांना विरोध दर्शवत आंदोलकांनी घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवला. यावेळी पुणे- बेंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी या आंदोलनात त्या सहभागी झालेल्या सत्वशीला चव्हाण यांच्यासह अन्य आंदोलकांनाही ताब्यात घेतले आहे. 
error: Content is protected !!