सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पण उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकरीने वापर करणे काळाची गरज आहे. या पाण्याच्या बाबतीत फक्त स्वतःच्या गावाचा विचार न करता संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विचार करायला हवा आणि एकमेकांच्या सहकार्यातून सर्व गावांचा विकास व्हायला हवा, असे आवाहन ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त कल्पनाताई साळुंखे यांनी केले.
ग्रामगौरव प्रतिष्ठान व लोकगौरव विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, रणदुल्लाबाद, पळशी आदी गावातील शेतकऱ्यांचे पाणी पंचायतच्या खळद येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यशाळा झाली. यावेळी ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे उपस्थित होत्या. यावेळी शेतकऱ्यांना जलसंधारण, सेंद्रीय शेती आणि बाजारपेठ यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सोनाली शिंदे म्हणाले, ग्रामगौरव संस्थेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम सुरू आहे. हे जलसंधारणाचे काम सुरू असताना तेथील विविध प्रश्नांची ओळख झाली. उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या अपेक्षेने रासायनिक खतांचा वापर केले जातो. ते न करता आपल्या आरोग्य आणि भविष्यातील पिढीला काही उज्वल भविष्यासाठी सेंद्रीय शेती करावी. त्याच्या माध्यमातून स्वतःचा विकास साध्य करावा.
शेतीमाल प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन या विषयांवरती कार्यशाळा आयोजित केली गेली. कोरेगांव तालुक्यातील आसनगाव, दहीगाव, रणदुलाबाद , पळशी आदी गावातील एकूण ४२ जलमित्र व शेतकरी यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. यात शितोळे यांनी जमीन, वनस्पती, पाणी आणि मनुष्य यांच्यातील संबंध तसेच शेती, पाणी यातील संबंध शेतकऱ्यांना समजावून सांगितला. ज्ञानेश्वनर फडतरे यांनी शेतीमालाच्या विक्री व्यवस्थापनाबद्दल माहिती सांगितले. कार्यशाळेतील दुपारच्या सत्रामध्ये शेवरी गावातील एकनाथ कामठे यांच्या शेतावर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सेंद्रिय शेतीची पाहणी केली तसेच शीतगृह आणि प्रोसेसिंग युनिट ची ही माहिती घेतली. तसेच क्षेत्र भेटीमध्ये माहूर गावातील माहूर जाई पाणी वापर संस्थेला ही शेतकऱ्यांनी भेट दिली व पाण्याच्या काटेकोर नियोजनावर बाबत माहिती घेतली.
You must be logged in to post a comment.