रानगव्याच्या हल्ल्यात पिसाडीतील शेतकरी जखमी


सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : बामणोली परिसरातील पिसाडी ता.जावली जि. सातारा येथील शेतकरी रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पिसाडी गावचे लक्ष्मण बाबुराव माने (वय ६०) हे सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपली गुरे चरायला सोडण्यासाठी शिवारात गेले होते. रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. माने हे रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पूर्णपणे रक्त बंबाळ झाले. माने यांनी आरडाओरडा करताच गावातील ग्रामस्थ डोळेझाक शिवाराच्या दिशेने धावून गेले तोवर कालवा झाल्याने रानगवा पळून गेला.


error: Content is protected !!