साताऱ्याच्या ऐतिहासिक वारसामध्ये पडणार भर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – राजमाता कल्पनाराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतुन सातारा शहराच्या ऐतिहासिक वास्तुमध्ये भर घालण्यासाठी काही ऐतिहासिक स्ट्रक्चर उभारण्यासंदर्भातील चर्चा नाशिकवरून आलेले फायबर वर्क एक्सपर्ट श्री संजीव खत्री व त्यांच्या टीम सोबत करण्यात आली.

चर्चा झाल्यानंतर जवाहर उद्यान राजवाडा (गोल बाग), कमानी हौद, सातारा नगरपरिषदेची नियोजित इमारत, ग्रेड सेपरेटर, पोवई नाका शिवतीर्थ तसेच सातारा नगरपरिषदेची इमारत, गोडोली तळे या ठिकाणची पाहणी मा. राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले समवेत नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिध्दी पवार,  अँड. दत्तात्रय बनकर, माजी उपनगराध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेथे, संगिता आवळे, माजी उपनगराध्यक्ष श्री. किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, सर्व सभापती तसेच मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, सिव्हिल अभियंता सुधीर चव्हाण, पंकज चव्हाण, नाशिक येथुन आलेले फायबर वर्क एक्सपर्ट संजीव खत्री व त्यांच्या टीमने केली.

उभारण्यात येणारे संपुर्ण स्ट्रक्चर हे अँडव्हान्स फायबर वर्क मध्ये असणार आहे, हे साहित्य अतिशय टिकाऊ, मजबुत आणि स्ट्रेचप्रुफ असणार आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्याअनुषंगाने संजीव खत्री यांना प्लॅन सादर केले होते व प्लॅन नुसार त्यांनी वर्कआऊट करून श्री-डी इमेजेस तयार करुन आणल्या होत्या व त्या दाखविण्यात आल्या. आता सातारा शहराचा चेहरा मोहरा चांगल्याप्रकारे बदलण्यास मदत होणार आहे याच बरोबर सातारा शहरामध्ये येणारे विविध ठिकाणचे प्रवेशद्वारे जसे की, कराड- सातारा, कोरेगाव-सातारा, पुणे-सातारा याठिकाणी भव्यदिव्य अशा कमानी ऐतिहासिक चेहरा देऊन उभारण्यात येणार आहेत. सदरच्या वरील सर्व कामांमुळे ऐतिहासिक वारसामध्ये भर पडणार आहे.

error: Content is protected !!