सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. रुग्णांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आदी आरोग्य सेवा मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत हात भार लावण्याच्या हेतून सातारा जिल्हा परिषदे कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांनी प्रत्येक दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी गोळा होणार असून त्यातून ५५ व्हेंटिलेटर खरेदी केले जाणार आहेत. ते प्रत्येक तालुक्यात पाच याप्रमाणे त्याचे वितरण केले जाणार आहे.
जिल्ह्यात सध्यास्थितीत १ लाख ७८८ कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. तर २४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दररोज दीड हजार रुग्ण बाधित होत असून ३५ जणांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षस्थानी त्यांच्या शासकीय निवास स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व प्राथमिक शिक्षक संघटनांनीही प्रत्येक कर्मचाऱ्याने दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे तीन हजार कर्मचारी दोन दिवसांचे वेतन, साडे आठ हजार प्राथमिक शिक्षण प्रत्येक दोन हजार अशा प्रकारे साधारण सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी गोळा होणार असुन यातून ५५ व्हेंटिलेटर खरेदी केले जाणार आहेत. ते प्रत्येक तालुक्यात पाच या प्रमाणे वितरीत करण्यात येणार आहेत.
You must be logged in to post a comment.