सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना जलाशयाच्या परिसरात असलेल्या खिरखंडी येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले आहे. काही कुटुंब अजूनही तेथेच वास्तव्यात असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, खिराखंडी ता. जावली येथील मुलींच्या जीवघेण्या शिक्षण संघर्षावर काही वृत्तपत्र व मीडिया यांच्या माध्यमातून वृत्त जाहीर करण्यात आले आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले गेले आहेत. हा जीवघेणा प्रवास थांबवा यासाठी श्रमिक मुक्ती दलाने १९८६ पासून आवाज उठवलेला आहे. आणि त्यांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. त्या आधारावर महसूल चे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले, व जिल्हा प्रशासनाच्या वतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अश्या प्रकारे बातम्या आल्या आहेत.
खरं पाहता खिराखंडी हे वन्यजीव विभागाने ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन केले गेलेले गाव आहे. त्या गावातील सर्व लोक ठाणे जिल्ह्यातील एकसळ ह्या ठिकाणी जाऊन राहत आहेत. परंतु त्यातील ६ कुटुंब हे स्थानिक दलाल व वन अधिकाऱ्यांच्या मधील दलाल यांनी तुम्हाला चांगली जमीन देतो, पैसे देतो अश्या प्रकारची आश्वासन दिले गेले असल्यामुळे हे लोक ठाणे जिल्ह्यात गेले नाहीत. ह्याची जबाबदारी ही वन्यजीव अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे संबंधित खसून चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहे.
त्याच बरोबर हे एकच गाव असे नाही की त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. तर कांदाटी खोऱ्यासह, सोळशी खोरे आणि कोयना खोऱ्यात सुध्दा असाच प्रवास करावा लागतो. आणि या ठिकाणी ते ज्या ठिकाणी राहतात ते कायदेशीर राहतात, तिथे ही या गंभीर बाबीवर शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशीही मागणी आम्ही करीत आहे.
You must be logged in to post a comment.