सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बातमी का लावतो?म्हणत पत्रकार सुमित चोरमले यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नंदकुमार कचरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिल्यानंतर कचरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी चोरमले यांच्या मागणीवरून सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांची भेट घेतली.
याबेळी बोलताना जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्हा पत्रकार संघ हा नेहमीच खऱ्या पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. पत्रकार आहे. म्हणूनच मी धमकावतो आहे, असे म्हणून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. कायद्याचा वापर करुन गुन्हे दाखल करावेच लागतील, त्याचवेळी पत्रकार मित्रांनीही वातांकन करताना दुसरी बाजूही मांडली पाहिजे, पत्रकारितेच्या नावाखाली कोण चुकीचे बाघत असेल तर संघटना त्याच्या पाठीशी उभे राहणार नाही,शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले की, पत्रकाराला जाणून बुजून धमकी देण्याचा प्रकार या सातार्यात खपवून घेतला जाणार नाही, पत्रकार हे एखाद्याला न्याय देण्यासाठी काम करत असतात. मात्र, त्यांना धमकावल्यास सातारी हिसका दाखवू. यावेळी दीपक प्रभावळकर यांनीही आपली भूमिका मांडली. यावेळी सुजितआंबेकर, दीपक शिंदे, संतोष (सनी) शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, सचिन बर्गे, चंद्रकांत पवार, विट्ठल हेंद्रे, साई सावंत, तबरेज बागवान, अमित वाघमारे, गुरुनाथ जाधव, किरण मोहिते, प्रतीक भद्रे, व पत्रकार उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.